Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण, वर्धा पोलीस ठाण्यातही...

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण, वर्धा पोलीस ठाण्यातही जातीय अपमानाचा आरोप

SP India news channel संपादक योगिता पाटेकर 9604343287

वर्धा….. अर्पित वाहाने—8956647004

वर्धा:जिल्हाधिकारी कार्यालयात शांततेत निवेदन देण्यासाठी गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यावरच पोलीस अधिकाऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेलेल्या कार्यकर्त्याला व त्यांच्या आईलाही जातीय शिवीगाळ व मारहाणीला सामोरे जावे लागल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता विक्की महेंद्र सवाई, रा. वर्धा यांनी आज उपजिल्हाधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी संजय जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. 18 व 19 फेब्रुवारी 2025 रोजी घडलेल्या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

विक्की सवाई हे अनुसूचित जाती बौद्ध प्रवर्गातील असून ‘वीर अशोक सम्राट संघटना’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी 2025 रोजी “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरात सुरू करण्यात यावे” या जनहिताच्या मागणीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते. निवेदन स्वीकारल्यानंतर तेथील अनुरक्षक पोलीस अधिकारी क्षितिज अशोकराव रोकडे यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. काही वेळाने पुन्हा कार्यालयात गेले असता सदर अधिकाऱ्याने त्यांच्यावर हल्ला चढवला, सुमारे तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि अमानुष मारहाण व शिवीगाळ केली. ही संपूर्ण घटना जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असल्याचा दावा सवाई यांनी केला आहे.

या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी विक्की सवाई जेव्हा वर्धा शहर पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा त्यांची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांना व त्यांच्या सोबत आलेल्या आईला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावून सवाई यांच्याविरोधातच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यातच त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली, पायांच्या तळव्यांवर पट्ट्याने मारले गेले आणि जातीवरून अपमानित करण्यात आले, असा संतापजनक आरोप त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विक्की सवाई यांनी पोलीस अधीक्षक वर्धा, पोलीस आयुक्त नागपूर, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच राज्य मानव अधिकार आयोग व अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडेही स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय व वर्धा शहर पोलीस ठाण्यातील 18 व 19 फेब्रुवारी 2025 रोजीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जतन करून त्याआधारे निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक वर्धा, पोलीस आयुक्त नागपूर, पोलीस महासंचालक मुंबई, राज्य मानव अधिकार आयोग व राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग यांना पाठविण्यात आली आहे.

SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular