
मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती न्यूज करिता संपर्क साधावा
दिनांक: 25/05/2026 बल्लारपूर येथील विसापूर इंदिरा नगर, वॉर्ड क्र. 5 चे रहिवासी व बल्लारपूर पेपर मिलचे स्थायी व निष्ठावान कर्मचारी श्री. मंगेश विठ्ठल सोनटक्के (वय 51) यांचे आज, 25 मे 2026 रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक व दुःखद निधन झाले.
आज सकाळी 7:15 वाजता नेहमीप्रमाणे उठल्यानंतर पाणी पिल्यावर त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना तातडीने बल्लारपूर येथील वाघमारे रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्वभावाने अत्यंत शांत, मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष म्हणून परिसरात परिचित असलेले मंगेश सोनटक्के पेपर मिलमधील आपल्या कामाप्रती सदैव निष्ठावान होते. त्यांच्या अकाली निधनाने सोनटक्के कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात वृद्ध आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो व सोनटक्के कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
SP India News परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 💐
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
या चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा


