Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedफॅमिली रेस्टॉरंट'च्या नावाखाली दारूविक्रीला आळा घालण्याबाबत

फॅमिली रेस्टॉरंट’च्या नावाखाली दारूविक्रीला आळा घालण्याबाबत

मुख्य संपादक –योगिता पाटेकर mo.no.9604343287

अमरावती प्रतिनिधी द्वारा न्यूज

सध्या अनेक ठिकाणी ‘फॅमिली रेस्टॉरंट’ असा बोर्ड लावून सर्रासपणे दारूविक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत आहेत.

या हॉटेल्समध्ये जेवणापेक्षा दारू पिण्यावरच जास्त भर दिला जातो. बिलामध्येही जेवणाच्या तुलनेत दारूचे पैसे अधिक आकारले जातात. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांमुळे कुटुंबासह जेवायला येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिला व लहान मुलांना, प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक रेस्टॉरंटचा मुख्य व्यवसायच दारूविक्री हाच झाला आहे.

खेदाची बाब म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कारवाईच्या अभावामुळे या गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळत आहे.

 

तरी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन ‘फॅमिली रेस्टॉरंट’च्या नावाखाली दारूचा अड्डा चालवणाऱ्या सर्व हॉटेल्सचे परवाने तपासावेत आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ही विनंती.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूस करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular