
मुख्य संपादक– योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा
वामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवत पावसाचं ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर कायम राहणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असून तिथे उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी आज ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यातआलीआहे. शनिवारी ब्रह्मपुरीत ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्या सोबतच, चंद्रपुरातील तापमान देखील ४६.२ अंशांवर नोंदवलं गेलं आहे. तर आज देखील विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
विदर्भात आज सलग चौथ्या दिवशी अमरावती, चंद्रपूर व वर्धा या तीन जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे. तर नागपूर, यवतमाळ , अकोला व गडचिरोली जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट आहे.
हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. तर दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्याची माहिती आहे. रत्नागिरी, राजापूर ,लांजा ,संगमेश्वर या भागात मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असून हवामान विभागाने पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाच्या अनेक ठिकाणी सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याचे चित्र आहे. पुढील दोन दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने त्यांच्या घाट परिसरात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हवामान विभागाने या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


