मुख्य संपादक–योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
वर्धा अर्पित वाहाणे
मो895664700
नागपूर त्रिरत्न संस्कार समिती, हनुमान नगर, नागपूर च्या वतीने दिनांक 10 मे 2026 ला महाराजा टावर, क्रीडा चौक, हनुमान नगर,या सोसायटीमध्ये एक भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
या शिबिरामध्ये नागपूर महानगरपालिका च्या आरोग्य विभाग च्या वतीने रक्ताची चाचणी करण्यात आली. तसेच क्षयरोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या वतीने उपस्थित शिबिरामध्ये सर्व लाभार्थींचा छातीचा एक्स-रे काढण्यात आला. या शिबिरामध्ये 59 लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराची उद्घाटन त्रिरत्न संस्कार समितीचे अध्यक्ष श्री भीमरावजी गायकवाड आणि महाराजा टावर सोसायटीचे अध्यक्ष जयप्रकाशजी दुबळे (माजी क्रीडा आयुक्त) यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराजा टावरच्या सचिव मिलका ढोरे मॅडम उपस्थित होत्या.
या शिबिराचे आयोजन डॉक्टर हर्षवर्धन कांबळे वैद्यकीय अधिकारी, राज्य कामगार विमा योजना ,सोमवारी पेठ ,नागपूर यांनी केलेले होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नीरज लोहकरे ,सोनू कश्यक, धीरज ढोके ,विनोद लिहितकर,चंद्रशेखर मेश्राम, वैभव कांबळे , नाविन्या कांबळे आदींनी परिश्रम घेतले. तसेच या उपस्थित असलेल्या शिबिर लाभार्थींचा बीएमआय टेस्ट करण्यात आली, वजन ,ब्लडप्रेशर आदींची तपासणी करण्यात आली आणि हे शिबिर अतिशय उत्साहामध्ये पार पडले. आरोग्य धनसंपदा, ही ब्रीदवाक्य घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर प्रशांत बडवाईक, डॉक्टर तृप्ती बडवाईक,डॉक्टर सुरेखा रंगारी आदींनी या शिबिरामध्ये आपली वैद्यकीय सेवा दिली.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


