
मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287 SP India news
वर्धा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याने अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागातर्फे संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.

या अनुषंगाने दिनांक 23.05.2026 व 24.05.2026 रोजी विशेष नाकाबंदी दरम्यान संपूर्ण वर्धा जिल्ह्यात वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 16 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये कारवाई करण्यात आली. यात सेवाग्राम पोलीस स्टेशन 3, अल्लीपूर 3, आर्वी 1, कारंजा 2, पुलगांव 3 व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा 4 अशा एकूण 16 केसेसचा समावेश आहे.
कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण जास्त आढळून आले. अमोल कालिदास धुल, विक्की नारायण राऊत, अनंता पुरुषोत्तम बोरेरकार, दामोदर चंद्रभान शेलकर, आकाश पुरुषोत्तम जगताप, नरेंद्र मारोती डोंगरे, निलेश प्रेमराज डोबले, योगेश रमेशराव तलमले, उमेश रामकृष्ण जुवारे, दिवाकर दशरथ पारिसे, करण गुरुदयाल फडके, आनंद त्र्यंबकराव पाटील, अजय विजय भोयर, सचिन सिध्दांत शेंडे यांच्यासह इतर वाहन चालक दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आले.
वर्धा जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघातांवर प्रतिबंध घालण्याकरीता ही विशेष मोहीम दररोज संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सिटबेल्ट चारचाकी वाहन, अति वेगाने व दारू पिऊन वाहन चालवू नये. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांचेकडून करण्यात येत आहे.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


